श्रीरामपूर प्रतिनिधी(दि.२३ मार्च):-२२/०३/२०२३ रोजी रात्रीच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे मोहसीन उर्फे बुंदी इसाक कुरेशी,रा.कुरेशी मोहल्ला,वार्ड नं.2,श्रीरामपूर, याने,बाबर पुरा,पाण्याच्या टाकीजवळ,वार्ड नं.2,श्रीरामपूर येथे गोवांशिय जातीची जनावरे हे कत्तल करण्याच्या उददेशाने एका बंद खोलीत बांधुन ठेवली आहेत.आत्ता गेल्यास ते मिळुन येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तपास पथकास नमुद ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने, तपास पथकाने बिट अंमलदाराच्या मदतीने तात्काळ बाबर पुरा, पाण्याच्या टाकीजवळ, वार्ड नं.2,श्रीरामपूर येथे जावुन छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे मोहसीन उर्फे बुंदी इसाक कुरेशी,याने 1)1,20,000/- रु.कि.चे काळया,पांढऱ्या,तांबडया,रंगाची 6 गोर्हे (बैल) प्रत्येकी 20,000/- किं.चे. अंदाजे, 2)30,000/-रुकि.ची. एक पांढऱ्या रंगाची गाय, कि. अं. 3) 20,000/-रु. किं. चे दोन काळया, पांढऱ्या रंगाचे वासरं प्रत्येकी 10,000/-रु. किं. अं. असा एकुण 1,70,000/- रु. किंमतीचे जनावरे एका बंद खोलीत त्यांची कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था न करता गर्दी करुन त्यांना निर्दयतेने कत्तल करण्याच्या उददेशाने बांधुन ठेवलेली मिळुन आले.म्हणुन मोहसीन उर्फे बुंदी इसाक कुरेशी याचे विरुध्द श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुन्हा रजि.क्र. 288/2023 महाराष्ट्र प्राणी रक्षण(सुधारणा) अधिनियम 1955 चे सुधारित कायदा सन 2015 चे कलम 11, च, ज, छ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर,संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन,हर्षवर्धन गवळी यांचे कडील तपास पथकातील पोहेकॉ/शफिक शेख,पोना/अमोल जाधव, पोना/रघुवीर कारखेले, पोकॉ/राहुल नरवडे,पोकॉ/गौतम लगड,पोकॉ/रमिझ अत्तार,पोकॉ/गणेश गावडे, पोकाँ/मच्छिंद्र कातखडे, पोकॉ/शिवाजी बडे,पोकॉ/आजिनाथ आंधळे, पोकॉ/संभाजी खरात यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोना/ अमोल जाधव हे करीत आहेत.
