अहमदनगर प्रतिनिधी (दि.२३ मार्च):-दि. ०७/०१/२०२३ रोजी फिर्यादी नामे महेश गोरख आठवले वय ३८ वर्ष रा प्लॉट नं.७३ रेल्वेस्टेशन अहमदनगर यांनी आनंदऋषिजी हॉस्पीटल अहमदनगर येथे औषधोपचार घेत असतांना जबाब दिला की,दिनांक ०७/०१/२०२३ रोजी रात्री ११.०० वाजण्याचे सुमारास हॉटेल परिमलचे कंपाऊंड येथे दारु पाजण्यास नकार दिल्याचे कारणावरुन आरोपी नामे विजय भनगाडे (रा.भोरीचाळ रेल्वेस्टेशनरोड, अहमदनगर) व त्याचे इतर साथीदारांनी फिर्यादीस गळयावर चाकूने डोक्यात चॉपरने वार करून जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच लाथाबुक्यांनी शिवीगाळ, मारहाण केली आहे.वगैरे मजकुरच्या दवाखाना जबाबावरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं.३२/२०२३ भादंवि कलम ३०७,३२६,३२३, ५०४,३४ महापोकाक ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून सर्व आरोपी फरार झालेले होते.सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी नामे विजय गजानन भनगाडे वय ३१ वर्ष रा. भोरीचाळ रेल्वेस्टेशनरोड अहमदनगर हा नजरेआड झालेला होता.त्याचा शोध घेत असतांना कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,आरोपी नामे विजय भनगाडे हा त्याचे सहते घरी येणार आहे.अशी गुप्त माहिती मिळाल्याने पोनि/ चंद्रशेखर यादव सो यांचे आदेशाने गुन्हेशोध पथकाने रेल्वेस्टेशन येथील त्याचे राहते घराजवळ सापळा लावून आरोपी विजय भनगाडे यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंधाने चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेवून चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई/मनोज कचरे हे करित आहेत.आरोपी विजय भनगाडे याचे विरुध्द खालील गुन्हे दाखल आहेत.
1)कोतवाली पो.स्टे I २१८ / २०१८ भादवि १४३, १४७, ३३६ मुंबई पोलीस अधि १९५१ चे कलम 135 37
2)कोतवाली पो.स्टे I 277/2018 भादवि341,364,397
3)तोफखाना पो स्टे ३०२/२०१७ भादवि १४३, १४४,१४७३२४, ३२३
4)कोतवाली पोस्टे ३६७/२०१९ भादवि ३२३, ५०४, 506
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, पोसई/मनोज कचरे,पोलीस अंमलदार गणेश धोत्रे,शरद बाघ,योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर,संदिप थोरात, अमोल गाढे,सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ,सोमनाथ राऊत,सागर मिसाळ यांच्या पथकाने केली आहे.
