अहमदनगर प्रतिनिधी (दि.२३ मार्च):-तरुण-तरुणींना अश्लील हावभाव अथवा अश्लील कृत्ये करण्यास सुलभता मिळावी अशी कृत्ये करण्यास त्यांना जागा उपलब्ध करून देऊन त्याबदल्यात तासाप्रमाणे पैसे घेणाऱ्या नगर शहरातील तीन कॉफी कॅफे शॉपवर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच नगर शहर परिसरातील नागरिकांकडुन याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.या अनुषंगाने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाच्या अंमलदारांनी सायबर कॅफेंची अचानक तपासणी केली असता हा प्रकार आढळून आला.तसेच या कॅफेवर विना परवाना खाद्य गृहातून खाद्य पदार्थांची ग्राहकांना विक्री करताना आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे खटला दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव,पोहेकॉ/सतीश भांड,पोलीस अंमलदार गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे,रियाज इनामदार,योगेश खामकर, संदीप थोरात,अमोल गाढे,सुजय हिवाळे,कैलास शिरसाठ,सोमनाथ राऊत,सागर मिसाळ,श्रीकांत खताडे,अभय कदम यांच्या पथकाने केली आहे.
