राज्य सरकारने एसटीबस प्रवासाबाबत निर्णय घेतल्यावर इतक्या महिलांनी घेतला लाभ महिलांमध्ये आनंदाचे वातावरण
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२५ मार्च):-राज्य सरकारने महिलांना एसटी बस प्रवासासाठी सुरू केलेल्या तिकिटात ५० टक्के सवलत असणाऱ्या”महिला सन्मान योजनेचा” १७ ते २३ तारखेच्या दरम्यान दोन लाख ६६ हजार २९८ महिलांनी लाभ घेतला अशी माहिती अहमदनगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली.या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांची चांगली सोय झाली आहे व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महिला वर्गांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणूनच महिलांमधून या योजनेचे जोरदार स्वागत होत आहे.