पारनेर वार्ताहर(दि.२८ मार्च):-कर्जुले हर्या ता.पारनेर श्री हरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत मानद सचिव शिवाजी गोपाजी आंधळे यांचा कृतज्ञता सोहळा व अभिष्टचिंतन ह.भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी सभापती काशिनाथ दाते सर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास विष्णू शेठ शिंदे होते.तर ह. भ.प.भास्कर महाराज शिंदे, नगर सह्याद्रीची संपादक शिवाजी शिर्के,सॉलिसिटर शिवाजीराव सातपुते, सिताराम खिलारी सर,ॶॅड पांडुरंग गायकवाड,माजी सरपंच साहेबराव दादा वाफारे, सरपंच संजिवनी आंधळे प्रमुख उपस्थित होते.यावेळी बोलताना सभापती काशिनाथ दाते सर म्हणाले हरेश्वर महाराजांची पावन भुमी या भुमीत ह.भ.प. शास्त्री महाराजांपासून डॉ. नारायण महाराज जाधव पर्यंत अनेक समाजभुषण झाले.त्यांचे हातून समाज उन्नतीचे काम झाले. आदरणीय विष्णू शिंदे (आप्पा) यांनी या हारेश्वर शिक्षक संस्थेची स्थापना केली.या विद्यालयाच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले गेले.शिक्षणाची स्पर्धा झाली परंतु आपल्या गुणवत्तेच्या जोरावर हे विद्यालय चांगले स्थितीत चालू आहे.विद्यालयातून घडलेली अनेक विद्यार्थी, सुजान नागरिक तयार झाले पाहिजे, चांगल्या सेवेत गेले पाहिजे हे करण्यासाठी विद्यालयाचे सचिव शिवाजी आंधळे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष काम चालू आहे. पदावरून सेवानिवृत्ती घ्यायला मनाचा मोठेपणा लागतो. गेले वर्षापासून जिल्हापरिषदेच्या निवडणुक नाही.परंतु माझे अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद समाज कल्याण मार्फत सायकल दिली जाते. मी आपल्या शाळेतील मुलांना सायकल मिळण्याकरिता प्रस्ताव देण्यास सांगितले आणि आपण दिलेले सर्वच २६ प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा सभापती दाते सर यांनी केली. यावेळी बोलताना ह भ प भास्कर महाराज शिंदे म्हणाले परमपूजनीय विष्णू शेठ (आप्पा) यांनी सुरू केलेले हे विद्यालय, यामध्ये अनेकांनी दिलेले योगदान, यापैकी शिवाजीराव आंधळे! माणसाच्या जीवनाची विशेषता आहे या देहामध्ये तो देवत्वाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून मनुष्य देहाला आल्यानंतर परमात्म्याला जाणलं पाहिजे,ओळखलं पाहिजे, त्याची प्राप्ती करून घ्यावी, माणसात इतके सामर्थ्य आहे की तो स्वतःदेव होऊ शकतो.फार थोडा वेळ आपल्या हाती आहे. योग्य कर्तुत्व करा,मनुष्य देहाचं साफल्य करून घ्या,रमन महर्षींनी सांगितले मी कोण आहे याचा विचार करा,हे ज्या दिवशी समजेल,त्या दिवशी मनुष्य कृताह होतो. असो आपले आरोग्याची काळजी घ्या.आपण समाजाची काही देणे लागतो हे विसरू नये.येथे जमलेले मान्यवर जेव्हा तुमच्या वयात होते,तेव्हा त्यांना पायात चप्पल नव्हती, दप्तर नव्हते,कपडे नसायचे, आज २६ सायकल दाते सरांनी या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या,त्यावेळेस ज्यांच्या घरी सायकल,तो मोठा माणूस असायचा,या सर्वांनी खूप त्याग केला आहे. हीच शिकवण आपल्याला आत्मसात करावी लागेल. तुम्ही खूप शिका,मोठी व्हा, आपल्या शाळेचे, गावाचे आणि कुटुंबाचे नाव मोठे करा रामदास आंधळे अध्यक्ष,हरेश्वर शिक्षण संस्था यावेळी मुख्याध्यापक शिवाजी घुले,दिलीप इघे, जालिंदर आहेर,मधुकर बर्वे व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, व्हि.जी.जाधव, एस.डी. आंधळे,बबन शिर्के,एकनाथ दाते,लहू वाफारे,गणपत शेठ वाफारे,संस्थेचे उपाध्यक्ष सुदाम जाधव,अनंथा शिर्के, एल.के.दाते,निवृत्ती आंधळे, रामदास आंधळे, भीमराज आंधळे,सखाराम शिंदे सर, पांडुरंग कांबळे,बबन आंधळे, शशिकांत आंधळे,रामदास कोरडे,पांडुरंग जाधव, सुखदेव रोकडे इत्यादी ग्रामस्थ व मान्यवर,विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम आंधळे यांनी केले तर आभार मधुकर बर्वे यांनी मानले.
