अहमदनगर प्रतिनिधी (दि.२८ मार्च):-नगर तालुका पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन 05 आरोपी विरुध्द कारवाई करुन 2,08,000/- (दोन लाख आठ हजार) रुपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने 3,500 लि.कच्चे रसायन व 330 लि.तयार दारु नाश स्थानिक गुन्हे शाखाची जबरदस्त कारवाई,श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सफौ/बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/बबन मखरे,संदीप घोडके,पोना/शंकर चौधरी, पोकॉ/शिवाजी ढाकणे,रविंद्र घुगांसे व चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दि.24/03/23 व दि.25/03/23 रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून 05 ठिकाणी छापे टाकुन एकुण 2,08,000/- रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे 3,500 लि.कच्चे रसायन, 330 लि. गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे 05 आरोपीं विरुध्द नगर तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण-5 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेने या हातभट्टी ठिकाणांवर छापा टाकून दारू नाश केली आहे व तसेच पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे,याचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे परंतु स्थानिक पोलीस करतात तरी काय अशी नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
अ.नं. पोलीस ठाणे गुरनं व कलम आरोपीचे नांव जप्त मुद्येमाल
1)नगर तालुका गु.र.नं. 218/2023 मप्रोऍ़क 65 (ई) (फ) 1) नाथा बटाव पवार, वय 52, रा. निमगांव वाघा, ता. नगर 10,000/- रु.किची 100 लि. तयार दारु
30,000/- रु.किचे 600 लि. कच्चे रसायन
2)नगर तालुका गु.र.नं. 219/2023 मप्रोऍ़क 65 (ई) (फ) 1) कुमार दादाभाऊ फलके, रा. निमगांव वाघा, ता. नगर 6,000/- रु.किची 60 लि. तयार दारु
45,000/- रु.किचे 900 लि. कच्चे रसायन
3) नगर तालुका गु.र.नं. 220/2023 मप्रोऍ़क 65 (ई) (फ) 1) मारुती छबु चौगुले रा. चौगुले वस्ती, नेप्ती, ता. नगर 9,000/- रु.किची 90 लि. तयार दारु
10,000/- रु.किचे 200 लि. कच्चे रसायन
4) नगर तालुका गु.र.नं. 222/2023 मप्रोऍ़क 65 (ई) (फ) 1) आबासाहेब बजरंग गि-हे, रा. खंडाळा, ता. नगर 5,000/- रु.किची 50 लि. तयार दारु,50,000/- रु.किचे 1000 लि. कच्चे रसायन
5)नगर तालुका गु.र.नं. 223/2023 मप्रोऍ़क 65 (ई) (फ) 1) गणेश पोपट गि-हे, रा. खंडाळा,ता.नगर 3,000/- रु.किची 30 लि. तयार दारु
40,000/- रु.किचे 800 लि. कच्चे रसायन,एकुण 05 पुरुष,33,000/-रु.किची 330 लि.तयार दारु,1,75,000/- रु.किचे 3,500 लि. कच्चे रसायन
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री. अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर ग्रामिण विभाग अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
