अहमदनगर प्रतिनिधी(दि.२८ मार्च):-शहरातील सावेडी उपनगर भागात राहणारी पीडित तरुणीवर गावडे मळा पाईपलाईन रोड येथील इसमाने प्रेमाचे संबंध ठेवून तिची इच्छा नसतानाही वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.व तिला लग्नाचे आमिष कायम दाखवले परंतु जेव्हा जेव्हा पीडित तरुणी त्याला आपल्या भविष्याबद्दल काय असे म्हणत असे तेव्हा तो तिला कायम म्हणायचं की आपण लग्न करू परंतु त्याने तिच्याशी लग्न केले नाही तिची फसवणूक केली.पीडित तरुणीने तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये ता.२७ मार्च २०२३ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी मुकेश वीरेंद्र मिश्रा (रा.गावडे मळा पाईपलाईन रोड) याच्या विरुद्ध भादविक ३७६,३७६(२),अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.
