अहमदनगर प्रतिनिधी (दि.२९ मार्च):-बेकायदेशीर गुप्ती व फायटर बाळगल्या प्रकरणी एका इसमला कोतवाली पोलीसांनी घेतले ताब्यात,दि.२८ मार्च 2023 रोजी रात्री ०१.३० वाजण्याचे सुमारास कोतवाली पोलीसांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की,अहमदनगर शहरात एक इसम हा त्याचे लाल रंगाच्या बिगर नंबर प्लेटच्या होंडा डिओ मोपेड वाहनाच्या शिटखालील डिक्कीमध्ये गुप्ती व फायटर घेवून फिरत असुन तो कोठला स्टॅण्ड कडुन हातमपुरा चौकाकडे जात आहे,आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोनि/चंद्रशेखर यादव यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांना सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी रामचंद्र खुंट या ठिकाणी जावुन सापळा लावुन नमुद मोपेड वरील इसमास जागीच पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अल्फाज अन्सार शेख (वय २१ वर्षे रा.भांबळ गल्ली, भोसले आखाडा, अहमदनगर) असे सांगुन पोलीस अंमलदार यांनी त्याचे मोपेड गाडीच्या डिक्कीची पाहणी केली असता त्यात एक धारदार गुप्ती व एक स्टीलचा फायटर मिळुन आला.त्याबाबत त्यास विचारपुस करता त्यास समाधानकारक उत्तरे देता आली नाही त्या मुळे आरोपी विरोधात पोका/दिपक मिसाळ यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं.२९९/२०२३ आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना/बाळासाहेब मासळकर हे करत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, पोसई/एस.के.दुर्गे,पोलीस अंमलदार दिपक मिसाळ,गणेश ढोबळे,अशोक सायकर,अशोक कांबळे,होमगार्ड सागर दरेकर व आळकुटे यांच्या पथकाने केली आहे.
