संगमनेर प्रतिनिधी (दि.२९ मार्च):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरासह आसपासच्या खेडेगावात रोज एक ते दोन दुचाकी वाहनांची रोज चोरी होत होती.परंतु नव्यानेच बदलून आलेले संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तपास करून वाहन चोरांना चांगलाच पोलीसी खाक्या दाखवून जेरबंद केले आहे.संगमनेर येथील तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून तब्बल ५१ वाहन हस्तगत केल्या आहे.अक्षय सावन तामचिकर,सुरजित दिलीपसिंग तामचिकर (रा.भाटनगर,घुलेवाडी,ता.संगमनेर) ही दोघे आणि आणखी एक अल्पवयीन मुलाचा सामावेश असून त्यांनी आपल्या गुन्हाची कबुली दिली आहे.यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या गाड्या ह्या त्यांनी शिर्डी,आश्वी,घारगाव,बोटा, राजूर,अकोले,कोपरगाव,श्रीरामपूर,नेवासा, वावी,नांदुर शिंगोटे,नाशिक, देवळाली,एमआयडीसी,सिन्नर अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केल्या आहेत.त्यांनी गाड्या चोरी केलेल्या गुन्हाची कबुली दिली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन ज्यांच्या गाड्या चोरी गेल्या आहेत.त्यांनी गाड्यांचे आवश्यक कागदपत्रे घेऊन यावेत आणि आपली गाडी ओळखून कायदेशिर मार्गाने घेऊन जावी असे आवाहन केले.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस स्टेशन निरीक्षक भगवान मथुरे व कर्मचाऱ्यांनी केली आहे.
