प्रतिनिधी(दि.३० मार्च):-रायगड जिल्ह्यातील महाड येथील सी.ए.शुभम गांगण यांना “वाळसुरे भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आपल्या धाडसाने जगाला अचंबित करणारी धाडसी माता हिरकणीचे जन्मस्थान तसेच उत्तरेला रायगड किल्ला गावच्या तिन्ही बाजूंनी सह्याद्रीच्या रांगा रायगड किल्याचा टेहळी गांधारी नदीचे उगमस्थान अशी ओळख असलेल्या वाळसुरे गावात शिमगा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शुभमचे आजोबा चंद्रकांत गांगण हयात असताना त्यांच्या बरोबर सी.ए.होण्याची इच्छा व्यक्त करून ती इच्छा पूर्ण करण्यासाठी वडील संजय गांगण पोलीस उपनिरीक्षक, व मोठा भाऊ सुमित ह्यांच्या सहकार्याने आपल्या आवडी निवडी छंद बाजूला ठेवून “एकच ध्यास सी.ए.ची परीक्षा पास” हा मनाशी निश्चय करून दिवसरात्र अभ्यास करून मुंबई (कुर्ला) येथील शुभम गांगण ह्यांनी देशात अवघड समजली जाणारी सी.ए.ची परीक्षा पास झाला. मुळगाव वाळसुरे गावांनी त्याच्या ह्या अभूतपूर्व यशाची दखल घेऊन त्याला ग्रामस्थ मंडळ वाळसुरे व सोमजाई मित्र मंडळ यांच्या वतीने प्रतिष्ठेचा समजला जाणारा वाळसुरे भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. यावेळी गावातील महिला पुरुष वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
