मराठी मिशनचे सेक्रेटरी डॉ.डी.जी.भांबळ व चेअरमन डॉ.विजयाताई जाधव “बाबा आमटे शांति भुषण” पुरस्काराने सन्मानित
अहमदनगर प्रतिनिधी (दि.३१ मार्च):-मराठी मिशनचे सेक्रेटरी डाॅ.डी.जी.भांबळ आणि डॉ.विजया जाधव यांना *”बाबा आमटे शांति भुषण”* पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.याबद्दल क्लेरा ब्रूस हायस्कुल फाॅर गर्ल्स, अहमदनगर बॉईज हायस्कुल,रुरल हायस्कुल वडाळा मिशन,बाॅइज होस्टेल वडाळा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी मराठी मिशन संस्थेचे पदाधिकारी,एस.के.आल्हाट, डॉ.प्रभाकर, चक्रनारायन सर आदि मान्यवरासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.क्लेरा ब्रूस हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री.ओहोळ सर, यांनी सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन व चक्रनारायण सर यांनी फेटा बांधून सन्मान केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अनुपमा पवार यांनी केले व आभार मानले.यावेळी डॉ.डी.जी.भांबळ सन्मान केल्याबद्दल केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले.