Maharashtra247

कोयत्याने मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा फरार सराईत आरोपी कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.१ एप्रिल):-कोयत्याने मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा फरार सराईत आरोपी कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद घटनेतील सविस्तर माहिती अशी की,दि.०७/०८/२०२२ रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी नामे अभिजित मिलींद भिंगारदिवे(वय-२४ वर्षे धंदा-केक शॉप,रा.जिल्हा परिषदेच्या समोर माळीवाडा, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली की,यातील फिर्यादी व त्यांचे मित्रांनी आरोपी नामे किरण अरुण शिंदे यास तु आमच्या मोटारसायकल जवळ काय करत होता अशी विचारणा केली असता त्यास त्याचा राग येवुन त्याने इतर आरोपी नामे १)म्हम्या उर्फ संदिप शरद शिंदे २)दिपक शरद शिंदे ३)सोनु उर्फ सोन्या शरद शिंदे ४)एक अनोळखी इसम यांना बोलावुन घेवुन गैरकायदयाची मंडळी एकत्र जमवुन दिपक शरद शिंदे याने त्याचे हातातील कोयत्याने फिर्यादीचे पायावर मारुन गंभीर जखमी केले तसेच म्हम्या उर्फ संदिप शिंदे याने त्याचे हातातील कोयत्याने साक्षीदार अभिषेक बोडखे यास जिवे ठार मारण्याचे उददेशाने डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले व इतर आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी दांडके,सिमेंट ब्लॉक,वीट व लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ,दमदाटी केली वगैरे मजकुरच्या फिर्यादी यांनी दिलेल्या दवाखान्यातील जबाबावरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ६१२/२०२२ भादंवि कलम ३०७,३२६,३२४,३२३, ५०४,५०६,१४३,१४७,१४८, १४९ सह आर्म अॅक्ट ४ / २५,सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासुन आरोपी नामे सोनु उर्फ सोन्या शरद शिंदे,वय २२ वर्षे व त्याचे साथीदार हे नजरेआड झाले होते.त्याचा शोध घेत असतांना कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,आरोपी नामे सोनु उर्फ सोन्या शरद शिंदे हा त्याचे राहते घरी घरातील सदस्यांना भेटण्याकरिता येणार आहे.अशी गुप्त माहिती मिळाल्याने पोनि/चंद्रशेखर यादव यांचे आदेशाने गुन्हे शोध पथकाने बुरुडगांव रोड येथील त्याचे राहते घराजवळ सापळा लावुन आरोपी सोनु उर्फ शरद शिंदे यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंघाने चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने व त्याचे साथीदारांनी मिळुन सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असुन त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई/मनोज कचरे हे करीत आहेत. आरोपी सोनु उर्फ शरद शिंदे याचे विरुध्द खालील गुन्हे दाखल आहेत.

१)कोतवाली पो.स्टे २९२/२०१४ भादवि कलम ४६९,३८० प्रमाणे २५८ / २०१६ भादवि कलम ३८०, ४५७,३४ प्रमाणे

२)कोतवाली पो स्टे ४९६/२०१४ भादंवि कलम ३२७ प्रमाणे

३)कोतवाली पोस्टे ६१२/२०२२ भादंवि कलम ३०७,३२६ वगैरे

४)कोतवाली पोस्टे ८७७/२०१९ भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे

५)तोफखाना पो स्टे ४४०/२०१८ भादवि ३२४, ३२३,५०४,५०६,१४३,१४७, १४८,१४९

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोसई/मनोज कचरे,पोलीस अंमलदार गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे,अब्दुलकादर इनामदार,योगेश खामकर, संदिप थोरात,अमोल गाढे, सुजय हिवाळे,कैलास शिरसाठ,सोमनाथ राऊत, सागर मिसाळ यांनी केली आहे.

You cannot copy content of this page