कामावर यायला उशीरा का झाला कारण विचारले असता त्याने मालकिणीवर केले चाकूने सपासप वार
श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.१ एप्रिल):-श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील गणपती कारखान्यात कामाला असलेल्या मजुराला कामावर उशिरा का झाला..? असे विचारल्याचा राग अनावर झाल्याने या मजुराने कारखाना मालक खंडू चंदन यांच्या आईवर चाकूने हल्ला करून जखमी केले.यात गंभीर दुखापत झाली असल्याने,काल सायंकाळी ९:३० वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे.घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या मजुराला दोन तरुणांनी पाठलाग करत पकडुन पोलिसांच्या हवाली केलते.महीलेच्या मृत्युनंतर आरोपी विरुध्द भादवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे हे करत आहेत.