अहमदनगर प्रतिनिधी (दि.१ एप्रिल):-अवैध देशी व विदेशी दारूची वाहतूक करताना मुद्देमालसह एकास भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडले,दि.१ एप्रिल २०२३ रोजी ही कारवाई झाली असून मोहन शंकर गुंजाळ(वय 38 वर्षे रा.कोल्हेवाडी फाटा, सारोळा बद्दी,जामखेड रोड,ता.नगर जि.अहमदनगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.भिंगार कॅम्प पोस्टे गुरनं 183/2023 मप्रोकाक 65 (ई),80 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भिंगार कॅम्प प्रभारी अधिकारी सपोनी श्री.दिनकर मुंडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि,नगर जामखेड रोडने चांदनी चौक येथून एक इसम हा विनापरवाना बेकायदा देशी व विदेशी दारूची
वाहतूक करीत आहे अशी बातमी मिळाल्याने तेथे सापळा लावून मोहन शंकर गुंजाळ (वय 38 वर्षे रा. कोल्हेवाडी फाटा,सारोळा बद्दी,जामखेड रोड,ता.नगर जि.अहमदनगर) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचे ताब्यातून एक पांढरे रंगाची होंडा कंपनीची अॅक्टीवा 6 जी मॉडेलची मोपेड गाडी तीचा आरटीओनं एम.एच.16 सी एक्स 5152 तसेच देशी व विदेशी दारू असा एकूण 69,280 /- किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे,यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक/दिनकर मुंडे,पोना/2284 संदिप नारायण साठे,पोना/2178 राहुल राजेंद्र द्वारके,पोकाँ/810 अमोल नवनाथ आव्हाड,पोकॉ/691 सागर भास्कर तावरे अशांनी केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोहेकाँ/2068 गोपिनाथ गोविंद गोर्डे हे करीत आहेत.
