नेवासा(प्रतिनिधी २.एप्रिल):-अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फुस लावून पळून नेण्याच्या घटना वारंवार घडत असून त्यातच नुकतीच एक घटना समोर आली आहे नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील तरुणाने अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमीष दाखवून तिला फूस लावून शारीरिक संबंध ठेवल्याची घटना घडली. याबाबत फिर्यादीवरुन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,सुनील अंबादास तांबे (रा.घोडेगाव ता.नेवासा) याने डिसेंबर 2021 ते 31 मार्च 2023 या काळात छत्रपती संभाजीनगर येथे बळजबरीने तसेच तिला फूस लावून व तिच्यासोबत लग्न करतो असे खोटे आश्वासन देवून ती अल्पवयीन आहे हे माहिती असतानासुद्धा आरोपीने फिर्यादीसोबत शरीरसंबंध ठेवले.तसेच फिर्यादीचे पती यांचे पासून फिर्यादीला दिवस गेलेले असताना सुद्धा आरोपीने फिर्यादीशी शरीरसंबंध ठेवता यावे म्हणून फिर्यादीला गर्भपात होण्याच्या गोळ्या आणून देवून तिचा तीन महिन्याचा गर्भपात करण्यास भाग पाडले.फिर्यादीला मारहाण करुन मुक्का मार देवून शिवीगाळ केली.तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी सुनील अंबादास तांबे याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 376(2)(एन), 420, 313, 323, 504, 506, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कायदा कलम 4,6,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री.थोरात करत आहेत.
