अहमदनगर प्रतिनिधी(दि.५ एप्रिल):-माळीवाडा-आयुर्वेद चौकातील काटवन खंडोबा रस्त्यावर असलेल्या शहरातील प्रसिद्ध संजयनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचे काम सुरू झाले आहे.येथे राहणाऱ्या सर्वधर्मिय २९८ परिवारांना प्रत्येकी १ लाखात त्यांचे हक्काचे घर मिळून देण्यासाठी काम सुरू आहे. २९८ घरापैकी ३३ घराची सोसायटी तयार करून तेथील रहिवाशांना सुपूर्त केली आहे. या संजयनगर परिसरात राहणाऱ्या महिलांनी आर्थिक नियोजन कसे करावे,महिला बचत गटाचे फायदे काय असतात,याविषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेमध्ये महिलांना बचतगटांचे महत्त्व,बचत गटांना येणाऱ्या समस्या, बचतगटांमार्फत करता येणारे उद्योग,शासकीय योजना, विविध कर्ज योजना आदी विषयांवर प्रमुख मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले.महिलांना एकजूटीने उभे राहण्यास प्रेरित करण्यात आले.त्या महिलांना वेगवेगळ्या व्यवसाय कसे उघडावे, कोणते व्यवसायात जास्त आर्थिक फायदा मिळू शकतो, व्यवसाय कशा पद्धतीने केला जातो.महिला बचत गटा मार्फत केला तर कोणता फायदा असतो.या सगळ्या विषयी सविस्तर माहिती या कार्यशाळेत दिली.या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी श्री.नितीन थाडे,अँड.भाग्यश्री जरंडीकर,संजय नगर पुनर्वसन प्रकल्पाचे मानद सहसंचालक सौ.वैशाली चोपडा यांनी मार्गदर्शक केले. ही कार्यशाळा संपन्न होण्यासाठी संजयनगर पुनर्वसन प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री.प्रवीण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक प्रतिनिधी श्री.ऋतिक लोखंडे, सौ.अंजली व्यास,कु.सीमा जुनी,कू.साहिल पठाण, सौ.शारदा न्यालपेल्ली यांनी परिश्रम घेतले.
प्रविण कदम-प्रकल्प व्यवस्थापक,संजय नगर पुनर्वसन प्रकल्प, अहमदनगरमो.८२०८३०७३१९
