जळगाव प्रतिनिधी(दि.५ एप्रिल):-जळगाव जिल्ह्यातील खानदेशी कलाकार य कुमावत यांचे नवीन गाणे माय मी येसू व वणी गड ले नुकतेच रिलीज झाले आहे व काही तासात त्या गाण्याला हजारो प्रेक्षकांनी पसंती केली आहे हे गाणे Pramod Mahajan Jalgaon YouTube channel वर रिलीज झाले आहे.या गाण्याची सर्व तयारी प्रमोद महाजन यांनी केली आहे.तसेच या गाण्याची शूटिंग जळगावातील नशिराबाद येथे झाली आहे.या गाण्यात दोन जोडीचा समावेश आहे अजय कुमावत यांच्या सोबत प्रार्थना गायकवाड व प्रमोद महाजन सोबत नम्रता बाविस्कर य पण आहेत.व त्यांची नवीन कलाकारी बऱ्याच लोकांना आवडत आहे.काही तरी नवीन करावं म्हणून गाण्याची शूटिंग iPhone वरच आहे. गाणं सिंगर भैय्यासाहेब मोरे व मेघा मुसळे यांनी गायले आहे. गाण्याला म्युझिक प्रमोद महाजन यांनी केले आहे व सर्व डायरेक्शन प्रदीप भोई यांनी केले आहे एडिटिंग योगेश ठाकूर यांनी केले आहे.या गाण्यात प्रार्थना गायकवाड यांनी पहिल्यांदाच काम केले असून त्यांनीही चांगल्या प्रकारे गाण्यात आपली कामगिरी केली आहे.
