सातारा प्रतिनिधी (दि.६ एप्रिल):-महाराष्ट्रात येत्या दोन वर्षात विनयभंग व बलात्काराचे गुन्हे अति प्रमाणात दाखल होत आहेत.काही बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये महिला किंवा मुली या पुरुषाच्या किंवा मुलाच्या प्रेमात कित्येक वर्षापासून असतात व त्या कित्येक वर्षांमध्ये त्या मुलाबरोबर किंवा पुरुषाबरोबर सहमतीने या महिलेने किंवा त्या मुलीने शारीरिक संबंध सहमतीने केलेले असतात काही कारणास्तव त्या पुरुष किंवा मुलगा आणि ती मुलगी किंवा महिला यांच्यामध्ये नातेसंबंध तुटले किंवा त्यांच्यात काही भांडण झालं तर त्या महिला किंवा मुली पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने बलात्कार झाला किंवा विनयभंग झाला असे सांगतात ल.त्याप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार किंवा विनयभंगाचे गुन्हे दाखल करतात.जर प्रेम संबंध व शारीरिक संबंध हे सहमतीने झाले असल्यास जबरदस्तीने बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा कसा दाखल होतो. सर्वांनी या विषयांवर थोडा विचार करण्यासारखे आहे.हे विनयभंग व बलात्काराचे गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर पीडित महिला किंवा मुलगी किंवा तिचे कुटुंबातील सदस्य बलात्कार किंवा विनयभंग केलेल्या पुरुष किंवा मुलाकडे पैशाची मागणी करतात.त्यामुळे बलात्कार किंवा विनयभंग अशा तक्रारी महिलेने किंवा मुलीने पोलीस स्टेशनला येऊन दाखल केल्या की पोलीस प्रशासनाने त्या तक्रारीचा तपास करावा, शहानिशा करावी आणि जर खरोखरच विनयभंग किंवा बलात्कार घडला असेल तरच गुन्हे दाखल करावे अन्यथा करू नये कारण त्या पुरुषाने किंवा मुलाने ते कृत्य केल्याची पूर्णपणे खात्री करावी.कारण काही घटनेमध्ये फसवणूक ही होत असते आणि काही लोकांना लुबाडण्याचेही त्या दृष्टीने हे कृत्य घडलेले असते.असे गुन्हे ज्या व्यक्तीवर दाखल झाल्याने त्या व्यक्तीचे किंवा पुरुषाचे किंवा मुलाचे आयुष्य बरबाद होते व तो पुरुष किंवा मुलगा समाजात सामान्यपणे वावरू शकत नाही.जर तो मुलगा अभ्यासू असेल आणि शिकत असेल तर मग काय त्या मुलाचं आयुष्य संपलं असे होते.त्याचबरोबर त्याची पूर्ण कुटुंबाला ही आपला समाज विकृत नजरेने पाहायला लागतो व त्या पुरुष किंवा मुलाला नोकरी शिक्षण सर्व ठिकाणी तुच्छ नजरेने पहात असतात.त्यामुळे पोलीस प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे.की महाराष्ट्रातील व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात,शहरात, खेड्यात किंवा गावात अशा घटना घडत असतील तर पीडित महिलेची किंवा मुलीची तक्रार घेऊन त्याची पूर्णपणे शहानिशा करावी तपास करावा आणि जर त्यामध्ये खरोखरच बलात्कार किंवा विनयभंग घडला असेल तरच गुन्हे दाखल करावे अन्यथा करू नये.असे निवेदन सौ.प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका महालक्ष्मी आधार फाउंडेशन यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाला मेलद्वारे व काही ठिकाणी प्रत्यक्ष दिले आहेत.
