प्रतिनिधी (दि.६ एप्रिल):-पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथे दि.६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या जन्मोत्सवा दिवशी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.नारीशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.शारदा भुजबळ यांनी शिरूर पोलीस स्टेशन निरीक्षक यांना दि.५ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की हनुमान हे ब्रह्मचारी असून त्यादिवशी गौतमी पाटील सारख्या नृत्यांगणीचा नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवणे योग्य होणार नाही.तरी या कार्यक्रमास परवानगी देऊ नये कार्यक्रमाच्या ठिकाणी काही गाल बोट लागल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
