अहमदनगर प्रतिनिधी (दि.५ एप्रिल):-शहरातील नगर अर्बन बँक चौकात दि.५ एप्रिल रोजी दुपारी ३.४५ वा.सुमारास सर्वेश बार्शीकर यांच्यावर हल्ला झाला होता.स्वरूप गोपाळदास बार्शीकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं ३२५/२०२३ भादविक ३०७,३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने काही तासातच यातील आरोपी नामे १)अरबाज शकील सय्यद २)गिरीश सुनील वरकड यांना अटक केली.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस/उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे,पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन,पोलीस जवान तनवीर शेख,योगेश भिंगारदिवे,रियाज इनामदार,अमोल गाडे,संदीप थोरात,गणेश धोत्रे,सागर मिसाळ,सोमनाथ राऊत, योगेश खामकर,सतीश भांड यांनी केली आहे.
