अहमदनगर प्रतिनिधी (दि.१० एप्रिल):-महाराष्ट्र बालक मंदिर शाळेचे प्राचार्य श्री. सुरेश भगवान शेवाळे सर यांचा आज दि.१० एप्रिल २०२३ रोजी रोजी सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.ते या शाळेत त्यांनी २००५ ते २०१४ पर्यंत शिक्षक म्हणून काम पाहिले.त्यानंतर २०१५ ते २०२३ पर्यंत या शाळेचे ते मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते.त्यांनी शाळेला लावलेली शिस्त तसेच शाळेतील विद्यार्थी यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे म्हणून केलेली उपाययोजना याचे आजही पालक वर्ग कौतुक करतात.यावेळी शेवाळे सर यांचा युवा ख्रिस्ती आघाडी कडून सत्कार करण्यात आला.यावेळी युवाख्रिस्ती आघाडी युवा जिल्हाध्यक्ष राहुलदादा वैराळ,गौरव घोरपडे,प्रफुल भालेराव,अक्षय गायकवाड,राहुल शिरसाठ, सनी घोरपडे,आदी उपस्थित होते.
