नगर प्रतिनिधी(दि.१० एप्रिल):-महाराष्ट्रासह देशांमध्ये धर्मांतराच्या गैरसमजातून ख्रिस्ती समाजावर अन्याय अत्याचाराच्या वाढत्या घटना, खोटे गुन्हे दाखल करणे,चर्च व धर्मगुरूवर होणारे हल्ले, चर्चमध्ये घुसून उपासना बंद पाडणे,वास्तूंची नासधूस करणे या घटना पाहता ख्रिस्ती धर्म संपवण्याचा तर कट नाही ना? अशी समाज भावना होत चालली असून समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्रातील समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने मुंबई येथे राणीबाग ते आझाद मैदानापर्यंत शांततापूर्वक निषेध महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ख्रिस्ती समाज कृती समिती महाराष्ट्र राज्य समन्वयक अनिल भोसले यांनी दिली.राज्यात व देशात ख्रिस्ती समाजावर होणारे हल्ले,दिला जाणारा त्रास, समाजाला अस्थिर करण्याचा होणारा प्रयत्न याकडे आता शासनाने जाणीविने पाहावे व ख्रिस्ती समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ख्रिस्ती समाजाला न्याय द्यावा असे ही भोसले यांनी यावेळी म्हटले.या महामोर्चा मध्ये, महाराष्ट्रातील तमाम ख्रिस्ती समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ख्रिस्ती समाज कृती समितीचे मार्गदर्शक डॉ.प्रभूदास दुपते, समन्वयक अनिल भोसले,प्रा. डॅनियल काळोखे,डॉ.प्रमोद दळवी,सुनील उबाळे,आ. राजीव आवळे,अब्राहम आवळे,अँड.सिरील दारा, रूपास कलकत्ते,रीटाताई जाधव,सिंथिया घोडके, रेखाताई मगर,शार्लेट नाडे, ख्रिश्चन मीडिया प्रमुख रवी वैरागर,प्रा.बाबा खरात,डी.ज़ी भांबळ,प्रफुल्ल असुरलेकर, सॉलोमन गायकवाड,चंद्रकांत उजागरे,सागर घोडके,किरण पावर,डॉ.प्रवीणराजे शिंदे,डॉ. विश्वास वळवी,संदीप वाघमारे,मनोज प्रभुणे,दीपक कदम,निलेश सपकाळे, विजय निकाळजे,जो.जो. थॉमस,अनिल पडघडमल, जोसेफ डायस,रवींद्र गायकवाड,डॅनियल पगारे आदींनी केले आहे.
