अहमदनगर प्रतिनिधी (दि.१० एप्रिल):-अमरधाम समोरील एका मोबाईल शॉपी समोर बसून ऑनलाईन अॅपव्दारे आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणार्यास कोतवाली पोलिसांनी पकडले.शैलेस बाळकृष्ण लाटणे (वय 33 रा. सुयोग पार्क,लोंढेवस्ती जवळ, अ.नगर) नितीन कदम (केडगाव) असे सट्टा घेणाऱ्यांचे नाव आहे. या दोघा विरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शनिवारी दि.९ एप्रिल रोजी रात्री १०.३० च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.सध्या आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणात सट्टा बाजार सुरू आहे.यातून अहमदनगर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची दररोज उलाढाल होत आहे.परंतु मोठे मासे अजून पोलिसांना गळाला लागेनासे झाले आहे.सदरची कारवाई कोतवाली पोलीस स्टेशन निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक/मनोज कचरे,अंमलदार तनवीर शेख,पोना/योगेश भिंगारदिवे,पोना/ए.पी.इनामदार,संदीप थोरात, कैलास शिरसाठ,सागर मिसाळ,सोमनाथ राऊत,सुजय हिवाळे यांनी केले आहे.
