अहमदनगर प्रतिनिधी दि.१४एप्रिल):-भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मिरवणुकीवर सीसीटीव्हीची देखरेख राहणार असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी दिली.तसेच कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 91 इसमांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती दिली.तसेच भिंगार शहरात होणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती मिरवणूकीत भिंगार हद्दीमधील सर्व मंडळांनी मिरवणूक शांततेत पार पाडाव्यात असे आवाहन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन निरीक्षक दिनकर मुंडे यांनी यावेळी केले आहे.
