अहमदनगर प्रतिनिधी (दि.१४ एप्रिल):-नगर तालुक्यातील बहिरवाडी या छोट्याशा गावामध्ये आज 14 एप्रिल रोजी विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बौद्ध अनुयायांकडून शांततेत साजरी करण्यात आली.याप्रसंगी महामानव,घटनापती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ही प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या ठिकाणी गावातील बौद्ध अनुयायी व शिवभक्त दोन्ही प्रचंड समुदायासह उपस्थित होते.बांधकाम व्यवसायिक श्री.देविदास काळे,अशोक दारकुंडे यांनी डॉ. आंबेडकरांना मानवंदना दिली.यावेळी युवा नेतृत्व भीमसैनिक रवी पाटोळे,सुमित पाटोळे,संदीप पाटोळे,रावसाहेब पाटोळे, सुरज पाटोळे,सागर पाटोळे,मिथुन साळवे,अक्षय पाटोळे,मयूर पाटोळे,सुदाम पाटोळे,हे सर्व उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा.अशोक पाटोळे सर यांनी केले व सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
