अहमदनगर प्रतिनिधी (दि.१४ एप्रिल):-कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवार तळ्यातील अवैध वाळु उत्खनन व वाहतुकी विरुध्द कारवाई करुन दोन जेसीबी,दोन टेम्पो व एक ब्रास वाळु असा एकुण 50,20,000/-रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखने जप्त केला आहे.घटनेतील बातमीची हकिगत अशी की,जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळु उत्खनन/उपसा व वाहतुकी विरुध्द कारवाई करणे बाबतचे आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/संभाजी कोतकर, पोना/सचिन आडबल,पोकॉ/रोहित मिसाळ,मयुर गायकवाड असे कर्जत तालुक्यात अवैध वाळु उत्खनन व वाहतुकी विरुध्द कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करत असतांना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, राक्षसवाडी तळे,ता.कर्जत येथे इसम नामे संतोष ऊर्फ बंटी कोथंबीरे हा त्यांचे हस्तका मार्फत जेसीबीचे मदतीने तळ्यातील वाळुचा उपसा करुन ट्रॅक्टरमध्ये भरुन वाहतुक करत आहे.आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली.पोनि/दिनेश आहेर यांनी नमुद माहिती लागलीच पथकास कळवुन पंचांना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.नमुद सुचना प्रमाणे पथकातील पोलीस अंमलदार यांनी पंचांसह राक्षसवाडी,ता. कर्जत येथील राक्षसवाडी तळ्याजवळ जावुन आडोशाला थांबुन खात्री केली असता तळ्यामध्ये दोन इसम जेसीबीच्या मदतीने वाळु उपसा करुन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरतांना दिसले पथक व पंचांची खात्री होताच पथक त्यांचेवर अचानक छापा टाकुन पकडण्याचे तयारीत असताना एक जेसीबी व एक ट्रॅक्टर वरील चालक पोलीस पथकाची चाहुल लागताच अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले.दुसरा जेसीबी,ट्रॅक्टर चालकांना ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचेकडे वाळु वाहतुकीचे परवान्या बाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांचेकडे शासनाचा वाळु उत्खनन/उपसा किंवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसले बाबत सांगितल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)सागर राजेश शिंदे, वय 27,रा.वडळी,ता. श्रीगोंदा व 2)शुभम दत्तात्रय अधोरे,वय 24, रा.चोराची वाडी,ता.श्रीगोंदा असे सांगितले त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी सदर वाळु उपसा हा इसम नामे 3) संतोष ऊर्फ बंटी कोथंबीरे रा. साळनदेवी रोड,ता.श्रीगोंदा याचे सांगणेवरुन करत असल्याचे सांगितले.सदर इसमाचा व पळुन गेलेल्या जेसीबी व ट्रॅक्टर चालकांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही.ताब्यात घेतलेल्या आरोपींनी अवैधरित्या कर्जत येथील राक्षसवाडी तळ्यातुन शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकिय मालकिची वाळु अवैध उत्खनन व चोरी करुन पर्यावरणाचे नुकसान होईल असे कृत्य केल्याने आरोपींना 50,20,000/- (पन्नास लाख वीस हजार) रुपये किंमतीचे दोन जेसीबी व दोन ट्रॅक्टर टॉली व एक ब्रास वाळुसह ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. 198/2023 भादविक 379 सह पर्यावरण कायदा कलम 3,15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री.आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधीकारी,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
