अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ एप्रिल):-पाईपलाईनरोड येथील पंचवटी नगर मधील रहिवासी असलेले तसेच जय बजरंग विद्यालयाचे कलाशिक्षक प्रमोद उबाळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त दीड इंच खडूवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र काढले आहे.हे चित्र काढण्यासाठी त्यांना तब्बल तीन तास वेळ लागला.त्यांनी आपल्या कलाकृतीतून महामानवाला विनम्र अभिवादन केले.मूळचे परभणी जिल्ह्यातील रहिवासी असलेले उबाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले,जिजाऊ माता,यांचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने चित्र रेखाटले आहेत त्यांना परभणी जिल्ह्यात या कलाकृती बद्दल अनेक पारितोषिक ही मिळाले आहेत.

