अहमदनर प्रतिनिधी(दि.१५ एप्रिल):-अहमदनगर मधील व्यापारी दीपक नवलानी आणि प्रणिल बोगावत यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नगर शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.नगर मधील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारात सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन या बंदला पाठिंबा दिला आहे. संबंधित व्यापाऱ्यांच्या गोडाऊनकडे जाण्यासाठी जो रस्ता होता त्यामध्ये अडथळा आणल्याच्या कारणावरून संबधीत व्यापारी आणि आरोपींमध्ये काल वाद झाले. त्यानंतर हा वाद एवढा टोकाला गेली की, व्यापाऱ्यांवर धारदार शस्राने हल्ला करण्यात आला. संबधीत व्यापारी आणि आरोपींमध्ये काल वाद झाले.दरम्यान व्यापाऱ्यांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे.संबंधित आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे.आज सकाळ पासून सुरू झालेले ठिय्या आंदोलन अजूनही सुरूच आहे.यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
