महाड प्रतिनिधी (दि.१५ एप्रिल:-रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील मॉर्डन स्कूल चोचींदे येथील मुख्याध्यापिका कुमुदिनी चव्हाण यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना भारत सरकार च्या वतीने आदर्श शिक्षिका राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या बद्दल चीचींदे गावात व महाड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.त्यांच्या या अभूतपूर्व यशाची दखल घेऊन सृष्टी सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार त्यांच्या राहत्या घरी जावून करण्यात आला.व भावी उज्वल यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या सृष्टी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता जोष्टे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी . विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या समाजसेविका दीप्ती गावंड, वैदही मोरे,शालिनी महामुनकर,संगीता कांबळे,वैशाली भिंगारे,सृष्टी ट्रॅव्हल च्या सृष्टी अमर जोष्टे,वैशाली सागवेकर यावेळी प्रमुख उपस्थित होत्या.या सत्काराबद्दल मुख्यधापिका कुमुदिनी चव्हाण भारावून गेल्या त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.सृष्टी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संस्थापिका स्मिता जोष्टे व त्यांच्या सहकारी नेहमीच समाजामध्ये विविध स्तरावर अबाल वृद्धांसाठी विविध उपक्रम राबवून कार्य करीत असतात व विविध निस्वार्थीपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार करत असतात.सृष्टी संस्थेने महाड मधील पुरामध्ये अनेक नागरिकांना तसेच आदिवासी पाड्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तूंचे वाटप असो किंवा वृक्षारोपण असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम सृष्टी ट्रॅव्हल्सच्या वतीने वर्षभर राबविण्यात येतात.
