ठाणे प्रतिनिधी (दि.१६ एप्रिल):-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक व सांस्कृतिक मित्र मंडळ परेरा नगर लोकमान्य नगर पाडा नं.३.च्या वतीने भातररत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक व सामाजिक मित्र मंडळ व वाचनालय हे लोकमान्य नगर मधील एक प्रतिष्ठित मंडळ असुन सर्व महापुरुषांच्या जयंती तसेच अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात शांततेत व शिस्तीत स्वखर्चाने साजरे करतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी होऊन सर्व बंधू भगिनींना मंडळाच्या वतीने सरबत वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास परिसरातील अनेक नागरिकांनी उपस्थीत राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटोळे,सचिव सचिन पांगम, खजिनदार प्रशांत कांबळे,व सभासद विजय मुंडे,कैलास रणपिसे,संतोष वेदपाठक, लखण उमप,ॲड.किरण मगरे,निखिल बागुल,प्रदीप गुप्ता,अंकुश मौर्य,रामभाऊ वाडेकर,आशिष शिंदे, आकाश पाटोळे,श्रवण गुप्ता, मोहन शर्मा,नितीन कोकणे,अंकुश जोष्टे यांनी मेहनत घेतली.

