अहमदनगर प्रतिनिधी(दि.१८ एप्रिल):-भाजप नेते आ. नितेश राणे आज नगर शहरात येत असून राणे हे घरातील कापड बाजारातील व्यापाऱ्यांच्या भेटीसाठी येत आहे असे बोलले जात आहे.त्यांनी येताना शहरातील पन्नास हजार हिंदू तरुण बांधवांच्या रोजगारासाठी सरकारकडून एमआयडीसी करिता दहा हजार कोटींचे पॅकेज आणावे.तसेच टाटा, बिर्ला,महिंद्रा,बजाज या सारखे मोठ मोठे उद्योग घेऊन यावेत.यामुळे बाजारपेठेतील व्यापाराला देखील चालना मिळेल असे आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे पत्रकार परिषदेत केले आहे.तसेच व्यापारी नवलानींसह कांदा व्यापारी चिपाडेंना राणेंनी भाजपचे सरकार सरकार आहे ते भाजपचे आमदार आहे त्यांनी पीडितांना न्याय मिळवून देऊन मुख्य आरोपींना पोलिसांना सांगून अटक करावी अशी मागणी देखील किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
