नगर प्रतिनिधी(दि.१८ एप्रिल):-आमदार नितेश राणे यांनी नगर शहरात येऊन आमदार संग्राम जगताप यांच्या बद्दल वक्तव्य केले होते.त्या वक्तव्याचा आमदार संग्राम जगताप यांनी चांगला समाचार घेतला स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये त्या आमदाराची उंची माझ्या शर्टच्या दुसऱ्या बटनापर्यंतच आहे.स्वाभिमान विलीन केलेला आमदार नगर शहरात आला त्यांच्या उंचीचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते माझ्या शर्टच्या शेवटच्या दुसऱ्या बटनापर्यंतच आहेत त्यामुळे आमची नजरा नजर होत नाही.त्यांना जर नजर मिळवायची असेल तर त्यांनी मला सांगावे त्या ठिकाणी मी यायला तयार आहे,स्वाभिमान विलीन केलेल्या आमदाराच्या कुटुंबा बाबतीत माहिती घेतली तर 2016 साली तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री यांनी 20 जुलै 2016 च्या विधानसभा सभागृहांमध्ये अनेक काही गोष्टींचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला त्याची पार्श्वभूमी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.असेही आ.संग्राम जगताप म्हणाले.कोणीही चुकीचे वक्तव्य किंवा चुकीची भाषा नगर शहरात करत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल असे आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले.
