अहमदनगर प्रतिनिधी दि.१८ एप्रिल):-भिंगार पोलिसांचा बिंगो जुगार अड्ड्यावर छापा, भिंगार मधील शुक्रवार बाजार येथे केलेल्या कारवाईत ११२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.घटनेतील सविस्तर माहिती अशी कि,भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे हे मुकुंदनगर या भागामध्ये पाहिजे असलेले आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमी मिळाली की भिंगार शहरातील शुक्रवार बाजार येथे नेहरू मार्केटच्या पाठीमागे बिंगो जुगार काही व्यक्ती पैसे लावून खेळवीत आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी तात्काळ पथक तयार केले.त्यामध्ये सहाय्यक फौजदार वराट,पोलीस अमलदार अजय नगरे,अमोल आव्हाड,पोना/राहुल द्वारके, सागर तावरे कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून दुपारी 2 वाजेच्या सुमारास शासकीय गाडीने पथक गोपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे भिंगार शहरातील शुक्रवार बाजार येथील नेहरू मार्केटच्या मागे सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावर धाड टाकली यावेळी विनोदसिंग कैलाससिंग परदेशी(वय 38 राहणार एमजी रोड भिंगार) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये मिळाला माल 1)8000/- रुपये कि.चा एक काळे रंगाचा SAMSUNG कंपनीची 32 इंची स्क्रीन जुवा कि अं.2)3270/- रू रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा 1 असा एकून 11,270/- मुद्देमाल भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला.भिंगार पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सागर भास्कर तावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनोदसिंग कैलासिंग परदेशी यांच्या विरोधात गुरनं 217/2022 महा जुगार क्र.12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिसांनी केली आहे.
