नगर प्रतिनिधी(दि.१८ एप्रिल):-प्रवीण वांढेकर याची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा व मा.नगरसेविका सौ.वीणा बोज्जा यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी पै.किरण बडे,रोहित पोकळे,अशोक दगडखैरे,मनोज बोज्जा,साजिद शेख अंडेवाले अजय सैदणकर,सौ. सैदणकर,सोनू नाईक हे उपस्थित होते.या वेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा म्हणाले जितके कष्ट करून नोकरी मिळाली तितक्याच त्या नोकरीची कर्त्याव्याची जनिक ठेवून काम करणे गरजेचे आहे.पोलीस हा जनतेचा रक्षक असतो त्याची जाणीव ठेवून काम करावे.या वेळी मा.नगरसेविका वीणा बोज्जा यांनी वांढेकर यांची पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.शेवटी आभार चायनिज हॉटेल चे संचालक मनोज बोज्जा यांनी मानले
