
सातारा प्रतिनिधी (दि.१७ एप्रिल):-सोशल मीडिया साईट वरील पॉर्न साईट,फेसबुक रिअल,युट्युब व्हिडिओज, तसेच इतर भरपूर व्हिडिओ साईट या सर्व अश्लील व शारीरिक संबंध करणारे व्हिडिओ प्रसारित करतात या सर्व साईटवर प्रतिबंध लावावे जेणेकरून समाजामध्ये अल्पवयीन मुलं,मुली,महिला व पुरुष हे सर्व विकृत मानसिकतेचे शिकार होणार नाहीत व अश्लीलता पसरवणार नाहीत याबाबत. सध्या समाजामध्ये अल्पवयीन मुलं मुली १३ किंवा १४ वयामध्येच प्रेम संबंधात अडकून शारीरिक संबंध करतात व घरच्यांना कसलीही माहिती न देता घरातून पळून जातात.काही काही ठिकाणी तर १३ किंवा १४ वर्षांमध्येच अल्पवयीन मुलगी गरोदर राहते व मुलं जन्माला घालते, तसेच काही अल्पवयीन मुले मुली सोशल मीडियावर शारीरिक संबंधाचे व्हिडिओ बघून शारीरिक संबंधाच्या अधीन जातात त्याच प्रमाणे महिला व पुरुष हेही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर बघतात व शारीरिक संबंधाच्या अधीन होत जातात.अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये विकृती निर्माण होते व अभ्यासू मुलही आपले भविष्याची काळजी न करता समाजामध्ये विकृत होत आहेत त्यामुळे समाजामध्ये असलेले या सर्व घटनेचा अभ्यास करून मी तुम्हास हे निवेदन देत आहे की देशातील पंतप्रधान,राष्ट्रपती,गृहमंत्री, केंद्रीय मंत्री,तसेच इतर सर्व मंत्री व अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून या विषयावर चर्चा करावी व जितके ही सोशल मीडिया साईट आहेत त्यावर प्रतिबंध लावावे जेणेकरून आपला समाज शारीरिक संबंध खुलेआम सोशल मीडियावर दाखवत आहे व करत आहे या परिस्थितीवर कायमचा निर्बंध लागेल व आपल्या देश व देशातील सर्व नागरिक ही देशाच्या प्रगतीसाठी,संस्कृती साठी व सन्मानासाठी जागृत राहतील.अल्पवयीन मुले मुली हे आपल्या देशाचे भविष्य आहे हे अल्पवयीन मुलांना अभ्यास,खेळ व सांस्कृतिक याशिवाय दुसरे कसलेही छंद नसावे.आताची पिढी उलट दिशेने जात आहे आणि या सर्वांना वाचवण्याचं कार्य आपण सर्वांनी मिळूनच केले पाहिजे.म्हणूनच लवकरात लवकर सर्व केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडे माझे हे निवेदनाचे पत्र पाठवत, सातारा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती,पंतप्रधान,मुख्यमंत्री, व त्या विभागातील मंत्री यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा शेलार यांनी ही पोर्न साईट बंद करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली.