अहमदनगर प्रतिनिधी (दि.२१ एप्रिल):-नेवासा तालुक्यातील आपल्या सामाजिक कार्याने परिचित असलेले बाबासाहेब नामदेव शिंदे यांची नुकतीच पोलीस मित्र संघटनेच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे.पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा चौधरी यांच्या आदेशानुसार श्री.गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांच्या सूचनेनुसार व श्री.सुनील भाऊ पाटील अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने शिंदे यांना नियुक्त पत्र देण्यात आले आहे.त्यांनी दिलेल्या पत्रात म्हणले आहे की आपल्या संघटनेचे महत्त्व ओळखून पोलीस व नागरिकांना मदत करावी आणि संघटनेची प्रतिमा जनसमुदायांमध्ये उज्वल करावी की ज्याने संघटनेचा जनाधार मजबूत होईल व लोकहिताचे कामे होतील.दि.२१ एप्रिल २०२३ रोजी बाबासाहेब शिंदे यांना हे नियुक्त पत्र देण्यात आले.

