Maharashtra247

सात लाख रुपये लुटीचा बनाव केलेला तक्रारदारच निघाला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर प्रतिनिधी(दि.२४ एप्रिल):-सात लाख रुपये लुटीचा बनाव केलेला तक्रारदारच निघाला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,बातमीची हकिगत अशी की,फिर्यादी श्री.संदीप गणपतराव फुगे,वय 38,रा. पाचेगांव शिवार,ता.नेवासा याने बँकेतून होमलोन मंजुर झालेली 7,00,000/- रुपये रोख रक्कम काढुन ती कापडी पिशवीत ठेवुन मोटार सायकलचे हँडलला लावुन टाकळीभान ते पाचेगांव रस्त्याने घरी जात असताना काळे रंगाचे मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी दोन इसमांनी फिर्यादीची मोटार सायकल आडवुन चाकुचा धाक दाखवुन नमुद रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली.सदर घटने बाबत फिर्यादी यांनी नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. 450/2023 भादविक 392, 427 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

सदरची घटना घडल्यानंतर श्री.राकेश ओला,पोलीस अधिक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थागुशा अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/गणेश वारुळे,पोहेकॉ/मनोहर गोसावी,दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड,देवेंद्र शेलार, पोना/ज्ञानेश्वर शिंदे,संदीप दरंदले,रवि सोनटक्के, भिमराज खर्से,योगेश सातपुते, चापोहेकॉ/उमाकांत गावडे व संभाजी कोतकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन सदर गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन पथकास लागलीच रवाना केले.पथक नेवासा परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि/श्री.आहेर यांनी घटना ठिकाणास भेट देवुन फिर्यादीकडुन घटनेची माहिती घेत असताना फिर्यादी हा विसंगत माहिती सांगत असल्याचे निदर्शनास आल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थागुशा पथकास घटना ठिकाणचे व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करणे तसेच फिर्यादी संदीप फुगे यास विश्वासात घेवुन आरोपी व त्यांनी गुन्हा करताना वापरलेले वाहन या बाबत अधिक चौकशी करुन पुढील तपास करणे बाबत मार्गदर्शन केले.त्या प्रमाणे पथकाने फिर्यादीकडे कौशल्याने तपास करुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने मी लोकांकडुन उसनवार घेतलेले पैसे बुडविण्यासाठी बॅकेतुन काढलेली 7,00,000/- रुपये रोख रक्कम घरी नेवुन ठेवली व त्यानंतर रस्तालुट झाल्याचा बनाव करुन नेवासा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली अशी कबुली दिल्याने आरोपी नामे संदीप गणपतराव फुगे,वय 38,रा.पाचेगांव,ता.नेवासा यास 7,00,000/- रुपये रोख रक्कम त्याचे राहते घरातुन हस्तगत करुन त्यास ताब्यात घेवुन नेवासा पोस्टे येथे हजर केले.पुढील तपास नेवासा पोस्टे करीत आहे.सदर कारवाई श्री.राकेश ओला,पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,श्री.संदीप मिटके उविपोअ,श्रीरामपूर विभाग,अति.प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page