आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्त्यांचा २५ एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२४ एप्रिल):-आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी तसेच, आ.राणे यांना अहमदनगर जिल्हाबंदी घालण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी उद्या मंगळवारी (दि.२५) एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी दिला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत दरम्यान बाजारपेठेत व्यापारावर हल्ला झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे.मिरवणूक काढणारे मंडळ व आंबेडकरी जनतेमध्ये चिंतेचे वातावरण होते.तथापि पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक करून मिरवणुकीस बाधा येणार नाही,अशी उपाययोजना केली.व्यापारी हल्ला प्रकरणात जिल्हा बाहेरील व्यक्ती शहरात येऊन कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत.स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी चिथावणीखोर भाषणे करून शहरात दोन गटात दंगल घडण्याची परिस्थिती निर्माण करून अशांतता निर्माण करत आहे.महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचे वारंवार नाव घेऊन पोलीस प्रशासनावर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच महानगरपालिका आयुक्त अनुसूचित जाती वर्गातील असून,ते उच्च अधिकारी आहे हे त्यांना माहीत असूनही मुद्दाम शिवीगाळ करत अरेरावीची भाषा वापरून जाहीर दमबाजी केली त्यामुळे दि.२५ एप्रिल रोजी आंबेडकरी पुरोगामी बहुजन चळवळी मधील कार्यकर्ते यांनी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्चामध्ये विविध पक्ष व संघटना सामील होणार आहेत अशी माहिती आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी दिली आहे.
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले – गवई – आंबेडकर गट)
*पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे )
* राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग
*वंचित बहुजन आघाडी
*बहुजन समाज पार्टी
*ऑल इंडिया पँथर सेना
*महानगर पालिका कामगार संघटना
*भारतीय कम्युनिस्ट पक्ष
*चर्मकार विकास संघ
*भारतीय बौद्ध महासभा
*लाल निशाण पक्ष
*पीस फाऊंडेशन
*आम आदमी पार्टी
ठिकाण:-तारकपुर बस स्टँड ते पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर