अहमदनगर प्रतिनिधी(दि.२४ एप्रिल):-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 8 लाख 28 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त,घटनेतील माहिती अशी की,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अहमदनगर ते संभाजीनगर रोडवर गोवा राज्य निर्मित व विक्री करीता असलेली तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित मद्यसाठा टाटा मोटर्स कंपनीची सहा चाकी वाहनासह येणार आहे अशी माहिती मिळाल्याने उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी सापळा रचून थांबले असताना जवळपास 8 लाख 28 हजार रुपयांच्या अवैध मद्यसाठा सहा चाकी वाहनातून जप्त करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे.या वाहनाचा चालक नामे युवराज शिवाजी नाळे याची प्राथमिक चौकशी करून त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून 8 लक्ष 28 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा व वाहन जप्त करण्यात आले आहे.सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त व्ही.एन.सूर्यवंशी,संचालक सुनील चव्हाण,विभागीय उपायुक्त मोहन वर्दे, अहमदनगर अधीक्षक,गणेश द.पाटील,उपअधीक्षक राज्य उत्पादन सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए.बी.बनकर,दुय्यम निरीक्षक, डी.आर.ठोकळ,आर.पी. दांगट,एस.बी.विधाटे, सहायक दुय्यम निरीक्षक टी.बी.करंजुले सहायक एन. एस.उके,डी.आर.कदरे,ए.के. सय्यद जवान,श्रीमती एस.आर.आठरे,ए.ए.कांबळे, निलेश बुरा,डी.आर.बर्डे यांनी केली आहे.
