अहमदनगर प्रतिनिधी (दि.२५ एप्रिल):-अहमदनगर जिल्हयातुन १८ महिने हद्दपार असलेल्या इसमाने आदेशाचे उलंघन करुन शहरातील तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत आल्याने त्याचे विरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आदेशाने दि. २३/११/२०२१ पासुन १८ महिने हद्दपार करण्यात आलेला इसम नामे कुणाल ऊर्फ सनी अनिल कांबळे वय २५ वर्षे रा.निलक्रांती चौक यास अहमदनगर जिल्हा सरहद्दीतुन हद्दपार करण्यात आले होते.परंतु सनी अनिल कांबळे हा निलक्रांती चौक येथे कोणतीही पुर्वपरवानगी न घेता अहमदनगर शहरात दि. २५/०४/२०२३ रोजी रात्रीच्या सुमारास निलक्रांती चौक येथे मिळून आल्याने त्याचे विरुध्द पोहेकॉ/सुनिल शिरसाट यांचे फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. ५६७/२०२३ महा पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोना/गणेश चौधरी करत आहेत.सदरची कामगीरी ही श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, श्री.अनिल कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/ श्री.मधुकर साळवे,सपोनि श्री. नितीन रणदिवे,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोहेकॉ/सुनिल शिरसाट,पोना/संदिप धामणे, पोना/सुरज वाबळे,पोना/अविनाश वाकचौरे,पोना/वसीम पठाण,पोना/अहमद इनामदार,पोकॉ/दत्तात्रय कोतकर,पोकॉ/शिरीष तरटे, पोकॉ/सतीष त्रिभुवन,पोकॉ/ सचीन जगताप,पोकॉ/चेतन मोहीते व मोबाईल सेलचे पोकॉ/राठोड यांनी केली आहे.
