Maharashtra247

भिंगार परिसरातून एकजण दोन वर्षाकरीता तडीपार भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

भिंगार परिसरातून एकजण दोन वर्षाकरीता तडीपार भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

नगर प्रतिनिधी (दि.९.डिसेंबर):-आलमगीर व भिंगार परीसरात दहशत निर्माण करणारा जुडवा भावांपैकी एकास अहमदनगर जिल्ह्यातून 02 वर्षाकरीता तडीपार केले आहे.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोस्टेचे सहा.पोलीस निरीक्षक श्री.शिशिरकुमार देशमुख यांनी भिंगार कॅम्प पो.स्टे.कडून सोहेल अन्सार मोमीम (वय 24 वर्षे रा.मदनी मस्जिद जवळ,आलमगीर,भिंगार ता.जि.अहमदनगर) यांचे विरूद्ध उपविभागीय दंडाधिकारी नगरभाग,अहमदनगर यांचे कडे हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात आला होता.श्रीनिवास अर्जुन उप विभागीय दंडाधिकारी नगर भाग,अहमदनगर यांचे आदेशाने वरील गुन्हेगारास अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आल्याचा आदेश भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्याने वरील गुन्हेगारास अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे.असून तसा अहवाल मा.वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोस्टेचे सहा.पोलीस निरीक्षक श्री.शिशिरकुमार देशमुख,सफो/कैलास सोनार,पोहेकाँ/गोविंद गोल्हार,पोना/राहुल द्वारके,पोना/भानूदास खेडकर यांनी सदरची कारवाई केली आहे.

You cannot copy content of this page