अहमदनगर प्रतिनिधी (दि.२६ एप्रिल):-आर्ट ऑफ लिविंग आयोजित विश्व विख्यात संगीतकार विक्रम हजरा सोबत एक सुंदर आणि मंत्रमुग्ध करणार्या सत्संग कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू भगिनींना आमंत्रित करत आहे.दि.30 एप्रिल,सायं.७ वा.माऊली सभागृह या ठिकाणी हे सत्संग आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन गावडे माळा,पाईपलाईन रोड स्तिथ ज्ञान मंदिर वास्तुच्या दुसर्या टप्प्याच्या निर्माणासाठी केला जात आहे व ते एक *निधी उभारणी कार्यक्रम* (fund raising event) आहे. ज्ञान मंदिराचे Meditation Hall 2018 साली उभारण्यात आले होते. ज्याचे उद्घाटन गुरुदेव प.पू. श्री श्री रविशंकर जी यांच्या हस्ते करण्यात आले होते.ही वास्तू एक अत्यंत सुंदर व अद्भुत आहे ज्याला देशातील सर्वात उंच श्री यंत्र आहे,Meditation Hall च्या छतावर अगदी योग्य दिशां मध्ये राशी चक्रांचे चिन्ह कोरण्यात आले आहे, ज्यानुसार आपल्या राशि चक्रा खाली बसुन ध्यान केल्यास मनावर,शरीरावर प्रचंड सकारात्मक फायदा प्राप्त होतो.हे ज्ञान मंदिर वास्तूशास्त्राने संपूर्ण पणे संचालित आहे,ज्यामुळे या स्थानाची खूप उत्साहवर्धित आणि उत्तम ऊर्जा आहे ज्याचा महत्त्व उपासनेद्वारे अनुभवात येतो.या वास्तूचे निर्माण प.पू.श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शना खाली पूर्ण केले गेले आहे.गुरुदेव श्री श्री रविशंकरजी म्हणतात की प्रत्येक गावात,शहरात ज्ञान मंदिर उभारले जाणे आवश्यक आहे.आपल्याकडे सर्व आजारांपासून मुक्त होण्यासाठी,निरोगी राहण्यासाठी रुग्णालये आहेत,हेल्थ फिटनेस सेंटर आहेत,पण मनाला स्वस्थ, तणावा पासून मुक्त ठेवण्यासाठी,प्रसन्न,आनंदित, सकारात्मक ठेवण्यासाठी कुठलीच जागा नाही व ते कुठेही शिकवले देखील जात नाही.ज्ञान मंदिरामध्ये ध्यान, साधना,प्राणायाम शिकण्या ऐवजी आध्यात्मिक ज्ञान मिळवून आपल्या मनाला शांती प्राप्त करण्याची संपूर्ण शक्यता आहे.ज्ञान मंदिराच्या दुसर्या टप्प्याच्या विकास योजनेमध्ये,एक निवासी इमारत उभारण्यात येणार आहे जिथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे व इतर वेग-वेगळे ध्यान,योग शिबीर आयोजित केले जातील,नाडी परीक्षण कॅम्प,आयुर्वेदिक कुकिंग प्रशिक्षण,मुलांसाठी शिबीर आणि बरेच प्रकल्प रचले जातील ज्यातून लोकांना निरोगी शरीर व शांत मनाची अनुभूती मिळेल.गुरुदेव म्हणतात जो पर्यंत मनुष्य तणाव मुक्त होत नाही तो पर्यंत त्याला सफल मानता येणार नाही.सफल मनुष्य तोच ज्याच्या चेहऱ्यावर सदैव स्मित हास्य असते आणि कठीण परिस्थिती मध्ये सुद्धा तो संयम ठेवून पुढे जातो. गुरुदेवांचा स्वप्न आहे की विश्वातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य आणणे आणि हे विश्व ताणाव मुक्त करणे.आणि त्या पार्श्वभूमी वरच आर्ट ऑफ़ लिविंग अ’नगर चे प्रशिक्षक, स्वयंसेवक,गुरुदेव श्री श्री रविशंकरजी च्या मार्गदर्शनातून सतत लोकांच्या कल्याणासाठी सेवा देत असतात.त्यांचा एकच ध्येय आहे की ध्यान साधनेतून जे आनंद मला मिळाले ते लोकांना मिळावो आणि त्यासाठी आज २२ वर्षांपासून नगर जिल्ह्यात आर्ट ऑफ़ Living चे मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवले जात आहेत. या सुंदर आणि जनहिताच्या प्रकल्पामध्ये समाजात ल्या प्रत्येक व्यक्ती चे समर्थन मिळावो म्हणून आपणास अर्ज करण्यात येते की आपण पुढे येऊन देणगी या ज्ञान मंदिराच्या विकास कामासाठी द्यावी कारण आपल्या हातून घडलेले हे पुण्य येणाऱ्या युगा-युगां पर्यंत प्रत्येक व्यक्तीला आनंद आणि मनशांतीची अनुभूती देणार आहे.तरी आपण ३० एप्रिल रोजी,सायंकाळी ७ वाजता, माऊली सभागृहात होणार्या या मंत्रमुग्ध सत्संगचा आस्वाद घ्यावा अशी आर्ट ऑफ़ लिविंग अ’नगर च्या वतीने विनंती करण्यात येत आहे. या सत्संग कार्यक्रमाचे डोनेशन पास खाली दिलेल्या link वरुण आपण ऑनलाइन घेऊ शकता.
त्वरा करा *maryadit जागा शिल्लक*
Donation Pass Link –
*http://aolahmednagargkevents.in*
आर्ट ऑफ़ लिविंग
अ’नगर परिवार .
संपर्क – 9890157655
