अहमदनगर प्रतिनिधी (दि.९ मे):-मोटार सायकल चोरी करणारा आरोपी 75,000/- रु.किंमतीच्या होंडा युनिकॉर्न मोटार सायकलसह स्थानिक गुन्हे शाखेला जेरबंद करण्यात यश आले आहे.बातमीची हकिगत अशी,दि.27/04/23 रोजी फिर्यादी श्री.बाबासाहेब भिकाजी पाटोळे,वय 55,रा. आश्वी बुा,ता.संगमनेर यांनी त्यांचे राहते घरासमोर लावलेली होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटार सायकल अनोळखी इसमांनी चोरुन नेली होती.सदर घटनेबाबत आश्वी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं. 107/2023 भादविक 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थागुशा यांना मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोना/रविंद्र कर्डीले,संतोष लोंढे,पोना/ज्ञानेश्वर शिंदे, फुरखान शेख,पोकॉ/रोहित येमुल,जालिंदर माने व चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या. पथकातील पोलीस अंमलदार हे शिर्डी,राहाता परिसरात फिरुन मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असताना पोनि/दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,शुभम काळे,गणेश नगर,ता.राहाता याने साथीदारांचे मदतीने चोरी केलेली होंडा युनिकॉर्न मोटार सायकल नेवासा फाटा येथे विक्री करण्यासाठी येणार आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती लागलीच पथकास कळवुन पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने पथकाने तात्काळ नेवासा फाटा येथील मुकिंदपुर कमानी जवळ रोडच्या कडेला सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम होंडा युनिकॉर्न गाडीवर येताना दिसला त्यास थांबवुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)गौरव राजेंद्र धनवटे,वय 21,रा. गणेशनगर,ता.राहाता असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे ताब्यातील होंडा युनिकॉर्न मोटार सायकल बाबत विचारपुस करता त्याने त्याचे साथीदारासह आश्वी बुा येथुन सदर मोटार सायकल चोरी केली असुन विक्री करण्यासाठी घेवुन जात असले बाबत माहिती दिल्याने त्यास 75,000/- रु.किंमतीचे होंडा युनिकॉर्न मोटार सायकलसह ताब्यात घेवुन आश्वी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास आश्वी पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपीचे इतर साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर व श्री. संजय सातव उविपोअ संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
