अहमदनगर प्रतिनिधी(दि.८ मे):-आरोपी नामे निलेश राजु झेंडे वय -२२ वर्षे रा.गेवराई रोड शेवगाव जि . अहमदनगर याने पिडीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा.पी.आर.देशमुख साहेब अतिरिक्त व विशेष (पोक्सो कोर्ट) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपीस भा.दं.वि.कलम ३७६ ( २ ) ( आय ) ( जे ) ( एन ) , ३७६ ( ३ ) व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ११ व १२ नुसार दोषी धरून आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व रूपये १०,००० /रूपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षे साधी कैदेची शिक्षा सुनावली.सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी.केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले.घटनेची थोडक्यात हकीगत की फिर्यादी यांची अल्पवयीन पिडीत मुलगी ही दहावी वर्गात शिक्षण घेत होती.दि.०४.०४.२०२२ रोजी पिडीतेचा दहावीचा शेवटचा पेपर होता.फिर्यादी हे संध्याकाळी जेवन करून झोपलेले असताना त्यांची पिडीत मुलगी ही रात्री ज्या ठिकाणी झोपली होती त्या ठिकाणी ती मिळून आली नाही म्हणून त्यांनी तिचा घरात व आजुबाजूला शोध घेतला.परंतु ती त्यांना मिळून आली नसल्याने त्यांनी शेवगाव पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरूध्द फिर्याद दिली.त्यानुसार शेवगाव पोलिस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्हयाचा सुरूवातीस तपास पो.हे.कॉ.वीर यांनी केला . शेवगाव पोलिसांनी पिडीत मुलीचा तपास केला असता ती आरोपी हा पिडीत मुलीला घेवून गणपती माथा वारजे येथे राहत असलेल्या ठिकाणाची माहिती मिळाली.त्यानंतर पोलिस व पिडीतेचे वडील हे घटनास्थळी पोहचले.तेथे शेवगाव पोलिसांनी वारजे पोलिसांच्या मदतीने पिडीत मुलगी व आरोपी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पिडीत मुलगी यांना घेवून शेवगाव पोलिस स्टेशन येथे आले.पोलिस स्टेशनला आल्यानंतर पिडीत मुलीने पोलिसांसमोर घटनेची माहिती सांगून जबाब दिला की, आरोपी निलेश राजु झेंडे पिडीतेस म्हणाला की तुझे पेपर संपले आहेत आपण आता पळून जावून लग्न करू,त्यानंतर दिनांक ०५ .०४.२०२२ रोजी आरोपी हा पिडीत मुलीस पळून घेवून पुणे येथे घेवून गेला.तिथे एका रूमवर तिच्या गळयात हार घालून घरातच लग्न केले.त्यानंतर २२ दिवसांनी पिडीतेला घेवून तो गणपती माथा वारजे येथे राहावयाय घेवून गेला.दोन्ही ठिकाणी राहत असताना आरोपीने पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील तिचेशी बळजबरीने शारिरीक संबंध केले.पोलिस पिडीतेचा जबाब झाल्यानंतर सदर गुन्हयास वाढीव कलम लागल्याने पुढील तपास सहा.निरीक्षक आशिष प.शेळके यांनी करून मा .न्यायालयात दोषारोपपत्र मुदतीत दाखल केले.या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले.यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी,पिडीत मुलीचे वडील पंच साक्षीदार वैद्यकीय अधिकारी तपासी अधिकारी वयासंदर्भात नगर परिषद शेवगावचे माहितगार इसम व मुख्याध्यापक यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.तसेच आलेला पुरावा व युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस मा.न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली.सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड.मनिषा पी.केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले.त्यांना पो.कॉ.विजय गावडे व पैरवी अधिकारी आर.व्ही.बोर्डे यांनी सहकार्य केले.
