अहमदनगर प्रतिनिधी:-भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर शहर शाखेतर्फे भगवान बुद्ध यांची 2567 वी जयंती (पौर्णिमा) उत्सव साजरी करण्यात आली.सिद्धीबाग येथील बुद्धविहार येथे शहर शाखेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी भगवान गायकवाड,राजेंद्र साळवे,माधवराव चाबुकस्वार,रवींद्र कांबळे,सुनीताताई गायकवाड,गौतम पाचारणे,लक्ष्मण महागडे, कल्पना रोकडे,डी.एम.गायकवाड,गोरख केदारे, अनिल तिजोरे,गुलाब गोरे,लीला पायळ,सिद्धांत कांबळे, चिराग पटेकर,हर्षदा पंचमुख, अर्चना गायकवाड,वृषाल साळवे,कश्यप साळवे,संदेश भोसले,धोंडीबा राक्षे,उमेश मोरे,वसंत पारधे,मालती शिंदे, प्रवीण मुरकुटे,राहुल पायळ, अजित घोडेस्वार,विजय चाबुकस्वार,प्रमिला मगर, अश्विनी जगताप,संगीता खंडागळे,सरला सातपुते,बाळू बनकर,दीपक शिंदे, निलेश भालेराव,विद्या शिंदे आदी उपस्थित होते.या प्रसंगी त्रिसरण बुद्धपूजा पाठ करण्यात आले व भगवान बुद्धांच्या गुणाचे स्मरण करण्यात आले व शहराध्यक्ष राहुल कांबळे यांनी भगवान बुद्ध यांचे जीवन चरित्र सांगितले तर उपाध्यक्ष राम गायकवाड यांनी बुद्धपूजा पाठ घेतला दुपारी धम्मदेसनेचा कार्यक्रम झाला भगवान बुद्धांचे बुद्धत्व प्राप्ती यावर दीपक पाटोळे यांनी प्रवचन दिले.त्यानंतर खीरदान करण्यात आले.त्यानंतर संध्याकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून धम्म रॅली काढण्यात आली.सिद्धीबाग येथे रॅलीचे उत्सव स्वागत करण्यात आले.यावेळी भोजनदान देण्यात आले यात हजारो उपासक सहभागी झाले होते.शहरअध्यक्ष राहुल कांबळे व उपाध्यक्ष राम गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
