अहमदनगर प्रतिनिधी (दि.९ मे):-नेवासा येथील अवैध वाळु चोरी व वाहतुक विरुध्द कारवाई करुन एक विटकरी रंगाचा टेम्पो व एक ब्रास वाळु असा एकुण 3,10,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे,पोना/संदीप दरदंले व पोना/ज्ञानेश्वर शिंदे अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमून अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकाने नेवासा पोलीस स्टेशन हद्यीत कारवाई करुन अवैधरित्या वाळु चोरी व वाहतुक करणा-या ठिकाणी छापा टाकुन एकुण 3,10,000/- (तीन लाख दहा हजार) रुपये किंमतीचा एक मालवाहतुक टेम्पो व एक ब्रास वाळु असा मुद्देमाल जप्त करुन खालील प्रमाणे आरोपीं विरुध्द नेवासा पोलीस स्टेशन येथे भादविक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अ.क्र.पोलीस स्टेशन गु.र.नं. कलम आरोपीचे नाव व पत्ता जप्त मुद्देमाल
1)नेवासा गु.र.नं. 510/2023 भादविक 379, 34 1)लक्ष्मण बहिरुनाथ पवार वय 35, रा.गंगानगर, ता.नेवासा
2)अरुण गोंजारी, रा. नेवासा बुा,ता.नेवासा 3,10,000/- रुपये किंमतीचा एक विटकरी रंगाचा मालवाहतुक टेम्पो व एक ब्रास वाळु
एकुण 02 आरोपी 3,10,000/- रुपये किंमतीचा एक विटकरी रंगाचा मालवाहतुक टेम्पो व एक ब्रास वाळु
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,श्री.संदीप मिटके उविपोअ,श्रीरामपूर विभाग, अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
