अहमदनगर प्रतिनिधी (दि.९ मे):-दहा गोवंशीय जनावरांना भिंगार कँप पोलिसांकडून कडून जिवदान,दिनांक 09 मे 2023 रोजी रात्री सपोनि/दिनकर एस.मुंडे यांना गोपनिय माहीती मिळाली कि.सदर बाजार,भिंगार येथे पोस्ट ऑफीसच्या पाठीमागे पत्र्याचे शेडमध्ये तारेचे कंपाऊंड मध्ये काही गोवंशीय जनावरांना शेडचे लोखंडी पोलला आखडून बांधून त्यांना चारापाण्याची व्यवस्ता न करता कृरतेने बांधून ठेवलेले आहेत.आता सदर ठिकाणी तात्काळ छापा टाकल्यास तो मुददेमालासह मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकला असता सदर ठिकाणी 1)मोहम्मद नूर कुरेशी वय 50 वर्षे रा.घर नं 37,सदर बाजार,भिंगार 2) निसार फत्तेमोहम्मद शेख वय 42 वर्ष रा.घर नं 70,सदर बाजार,भिंगार ता.जि. अहमदनगर असे मिळून आले पोलीसांची चाहूल लागताच एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला त्याचे नावा बाबत विचारपुस केली असता त्याचे नाव 3)अख्तर जोहर अहमद शेख वय 49 वर्षे रा.घऱ.नं 308,सदर बाजार, भिंगार ता.जि.अहमदनगर (फरार) असे असल्याचे समजले.त्यांचे कब्जामधून एकून 78,000/- रू.किं.चे एकून 10 गोवंशीय जनावरे मिळून आल्याने गोवंशीय जनावरे व आरोपी नं 01 व 02 यांना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला आणून आरोपीवर पोहेकॉ/643 रघूनाथ नानाभाऊ कुलांगे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं.270/2023 महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 चे कलम 5 (A)(1),9,महाराष्ट्र छळ प्रतिबंधक अधिनयम 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ/1072 राहुल गोरे हे करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे,कॅम्प पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दिनकर मुंडे,पोसई/एम.के.बेंडकोळी,पोसई/निसार शेख,पोहेकाँ/पांडूरंग बारगजे,पोहेकाँ/1072 राहुल गोरे,पोना/2178 राहुल द्वारके,पोकाँ/691 सागर तावरे, चापोकाँ/841 अरूण मोरे,पोकाँ/810 अमोल नवनाथ आव्हाड अशांनी केली आहे.
