अहमदनगर प्रतिनिधी (दि.१० मे):-शहरातील नेप्ती नाका शिवस्वीट हॉटेल नालेगाव अहमदनगर या ठिकाणी गावाकडे जाण्यासाठी दि.२०/०४/२०२३ रोजी वाहनाची वाट पाहत असताना फिर्यादी श्री.गंगाधर बापू झावरे(वय,६८ वर्ष,धंदा सेवानिवृत्त कर्मचारी,रा.गारगुंडी,कान्हूरपठार,ता. पारनेर,जि.अहमदनगर) हे उभे असताना अज्ञात आरोपीने त्याचे मोटर सायकलवर येवून आपण तुम्हाला ओळखतो असा विश्वास दाखवून फसवणुक करुन फिर्यादीस मोटर सायकलवर बसवून फिर्यादीची पिशवी हॅण्डलला लावून सुटटे पैसे दया असे म्हणून फिर्यादी यांच्याकडुन ४०००/- रु रोख रक्कम, २०,०००/- रु किमतीची अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी, ३०००/- रु किमतीचा सॅमसंग कंपनीची मोबाईल तसेच फिर्यादी यांचे पिशवीत असलेले महत्वाचे कागदपत्र घेवून जावून त्यांची फसवणुक करुन निघुन गेला.त्यावरुन कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथे गुरंन ३९१/२०२३ भादवी कलम ४२०,४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.दि.०९ मे रोजी २०२३ रोजी कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की कोतवाली पोलीस स्टेशन गुरंन ३९१/२०२३ भादवी कलम ४२०,४०६ हा गुन्हा आरोपी नामे ज्ञानदेव हरीभाऊ चेडे रा.हनुमान नगर,नगर दौड रोड,अहमदनगर याने केला असून आरोपी ज्ञानदेव चेडे हा अहमदनगर शहरातील नगर दौड रोड,हनुमाननगर, अहमदनगर येथे येणार असल्याची बातमी मिळाल्याने कोतवाली पोनि/चंद्रशेखर यादव यांच्या आदेशाने बातमीतील नमुद ठिकाणी पोना/९४२९ शाहीद सलीम शेख व पोकॉ/ ल१५७२ प्रमोद मधुकर लहारे यांनी बातमीतील नमुद ठिकाणी सापळा लावुन आरोपी नामे ज्ञानदेव हरीभाऊ चेडे हा सदर ठिकाणी आला असता त्यास पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन जात असताना त्याचा पोलीसांनी पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. त्यास विश्वासात घेवुन त्याच्याकडे अधिक चौकशी केली त्याने दिनांक दिनांक १०/१२/२०२२ रोजी दुपारी ०१.३० वा सुमारास वैभव हॉटेल चाणक्य चौक अहमदनगर येथे एका इसमास मी तुमच्या पुतन्याचा मित्र आहे असे सांगुन त्यांचा विश्वास संपादन करुन मी त्यांच्याकडुन सोनोग्राफीची फी ११००/- रुपये व त्यांची मो.सा क्र. एम.एच २३ यु ९१६९ ही चोरी करून घेवुन निघुन गेलो होतो अशी कबुली त्याने दिल्याने त्याबाबत खात्री केली असता त्यावरुन कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथे गुरंन १००२/२०२२ भादवी कलम ४२०,४०६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.आरोपीस अटक करण्यात आले आहे.आरोपी नामे ज्ञानदेव हरीभाऊ चंडे याच्या विरुद्ध कोतवाली पोस्टे येथे खालील गुन्हे दाखल आहे.
गु.र.नं व कलम
१)१००२/२०२२ भादवी ४२०,४०६ प्रमाणे.
२)३९१/२०२३ भादवी ४२०, ४०६ प्रमाणे.
३)५५३ / २०२१ भादवी ३६५,३९२ प्रमाणे
४)२४५/२०२१ भादवी ४२०, ४११ प्रमाणे
५)४९१/२०२१ भादवी ४२०, ४०६ प्रमाणे
६)३९२/२०२१ भादवी ४०६, ४२० प्रमाणे
७)३८९/२०२९ भादवी ४२०, ४११ प्रमाणे
८)२४९/२०२० भादवी ४२०, ४११ प्रमाणे.
९)१६५८/२०१९ भादवी ४०६, ४२०, ४१२,३४ प्रमाणे
सदरची कामगीरी ही श्री. राकेश ओला पोलीस अधिक्षक,अहमदनगर,श्री. प्रशांत खैरे,अप्पर पोलीस अधिक्षक,श्री.अनिल कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग, यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.चंद्रशेखर यादव, पोना/शाहीद शेख,पोकॉ/ प्रमोद लहारे,पोना/आनंदा दानी,पोना/सागर पालवे यांनी केली आहे.
