अहमदनगर प्रतिनिधी (दि.८ मे):-दि.२० फेब्रुवारी २०२३ रोजी फिर्यादी नामे मनिष मदनलाल फुलढाळे(वय ५२ वर्षे रा.महाविर अपार्टमेंट,ख्रिस्तगल्ली अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला हजर राहून फिर्याद दिली की,दिनांक १८/०२/२०२३ रोजी रात्री ००.०० ते दिनांक १९/०२/२०२३ सकाळी ०९.०० वाजण्याचे दरम्यान त्यांची रॉयल इनफिल्ड बुलेट एमएच २० बी ए ४३०४ ही त्यांनी त्यांचे राहते घरासमोर हॅन्डलॉक करुन पार्क करुन ठेवली असता ती त्यांचे राहते घराचे समोर कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरून नेली आहे.वगैरे मा च्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं १७२/ २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील चोरीस गेलेली बुलेट मोटारसायकल ही अहमद मुन्ना शेख रा. मुकुंदनगर अहमदनगर याने चोरी केली असुन त्याने चोरी केल्यानंतर सदरची बुलेट ही त्याचा साथीदार नामे शाहरुख आलम शेख रा.नागरदेवळे ता. नगर जि.अहमदनगर याचे राहते घरात लपवुन ठेवली होती व त्यानंतर कोठेतरी घेवुन जावुन ती खोलून तीचे सर्व वेगवेगळे स्पेअरपार्ट सुटटे करुन भंगारच्या दुकानामध्ये विक्री करुन त्याची विल्हेवाट लावलेली आहे व मिळालेल्या पैशाची दारु पिवुन मौजमजा केलेली आहे.अशी माहिती मिळाल्याने आरोपी नामे १) अहमद मुन्ना शेख रा. मुकुंदनगर अहमदनगर २) शाहरुख आलम शेख रा. नागरदेवळे ता.नगर जि. अहमदनगर यांना ताब्यात घेवून चौकशी करता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे देवुन पथकाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी सदरची बुलेट मोटारसायकल ही आम्ही चोरुन करुन नंतर तीचे सर्व स्पेअरपार्ट वेगवेगळे करुन ते भंगार विक्रेते दुकानदार आरोपी नामे ३) जावेद रऊफ शेख रा. सादिकमळा भिंगार अहमदनगर ४)राम विलास ससाणे रा.गजराजनगर अहमदनगर यांना विक्री केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या बुलेटचे वेगवेगळे सुटटे स्पेअरपार्टस,इंजिन,चेसीज रिकव्हर केले.मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपींना दोन दिवस तर मोटरसायकल खोलून विल्हेवाट लावणाऱ्या भंगार दुकानदारांना एक दिवस पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोनि/ चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोना/बाळासाहेब मासळकर हे करीत आहेत.अटक आरोपींना अधिक विचारपूस सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, गुन्हे शोध पथकाचे पोसई/ मनोज कचरे,पोहेकॉ/तनवीर शेख,पोहेकाँ/गणेश धोत्रे, पोना/योगेश भिंगारदिवे, पोना/ए.पी.इनामदार,पोना/योगेश खामकर,पोना/बाळासाहेब मासळकर, पोकों/संदीप थोरात,पोकाँ/अमोल गाढे,पोकों/सागर मिसाळ,पोकॉ/सोमनाथ राऊत,पोकों/सुजय हिवाळे, पोकों/कैलास शिरसाठ आदिंच्या पथकाने केली आहे.
