शरीरास हानिकारक असलेली २ लाख ४६ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू एलसीबी कडून जप्त,पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहमदनगर प्रतिनिधी(दि.१३ मे):-पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली २,४६,२५०/- रुपये किंमतीची सुगंधी तंबाखु, सुपारी,दोन इलेक्ट्रिक मशिन व साधने स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले आहे. घटनेतील माहिती अशीकी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे,पोना/रविंद्र कर्डीले,विशाल गवांदे व पोकॉ/शिवाजी ढाकणे यांचे पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत फिरुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदार मार्फता माहिती मिळाली की,खरवंडी कासार,ता.पाथर्डी येथे इसम नामे दत्तात्रय अंदुरे हा स्वतःचे घरामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला मावा मशिनव्दारे तयार करुन त्याची चोरुन विक्री करीत आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.नमुद सुचने प्रमाणे पथक बातमीतील नमुद ठिकाणी खरवंडीकासार,ता. पाथर्डी येथे जावुन खात्री केली असता एक इसम सुगंधी तंबाखु व सुपारीचा चुरा याचे मिश्रण करुन मशिनव्दारे मावा तयार करताना दिसला.पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकुन एका इसमास ताब्यात घेतले. त्यास पोलीस व पंचाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १)दत्तात्रय मथाजी अंदुरे वय ३९,रा.खरवंडी कासार,ता.पाथर्डी असे सांगितले.त्याचे कब्जातुन मावा तयार करण्यासाठी आवश्यक असलेली सुगंधी तंबाखु,सुपारीचा चुरा व दोन इलेक्ट्रीक मशिन असा एकुण २४६२५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द पोकॉ/१६९९ शिवाजी अशोक ढाकणे ने.स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४८०/२०२३ भादविक ३२८, १८८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर,श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग अति प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.